पूजेची पूर्वतयारी : -

गणपतीची स्थापना करण्याकरिता खालील पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी. तुम्ही चेकबॉक्स ला चेक पण करू शकता घेतल्यानंतर म्हणजे सर्व साहित्य लक्षात येईल


पुढील तयारी प्राणप्रतिष्ठेचा मंत्र

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।


अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्रीगणेशांना नमस्कार करून...

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।
पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।
ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।
चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।
दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।
मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।

हे श्लोक म्हणत असताना अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचे ध्यान करावे.

आवाहन मंत्र

आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।


असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।
स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।।


श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.

सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।
विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

अर्घ्य मंत्र

अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।


असे म्हणून पळीभर पाण्यात गंध , अक्षता , पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने , अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.

आचमन मंत्र

विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।
गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.

गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।
भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभिष्टदायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

पंचामृत स्नान मंत्र

पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।
पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत (पंचामृत म्हणजे दूध, दही, तुप, साखर आणि मध) अर्पण करावे. नंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर, गरम पाणी अर्पण करावे.

पंचामृत अर्पण केल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवावा. यानंतर उत्तर दिशेला सुरुवातीला वाहिलेली फुले, अक्षता म्हणजेच निर्माल्य विसर्जित करावे. यानंतर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा.

वस्त्र मंत्र

रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।
सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांना वस्त्र अर्पण करावे.

यज्ञोपवीत मंत्र

राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।
गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।


जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.

चंदन मंत्र

कस्तुरीरोचना चंदकुंकुमैश्च समन्वितम्।
विलेपनम् सुरश्रेष्ठ चंदनम् प्रतिगृह्यताम्।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांच्या मस्तकाला चंदन लावावे.

अक्षता मंत्र

रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।
ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांना अक्षता अर्पण कराव्यात.


पुष्प मंत्र

माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।
मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।


असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

धूप मंत्र

दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।
गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।


असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.

दीप मंत्र

सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।
गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।


असे म्हणून निरांजनाने श्रीगणेशांना ओवाळावे.

नैवेद्य मंत्र

नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।
ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांना नैवेद्य दाखवावा.

विडा मंत्र

पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ ।
कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।


असे म्हणून श्रीगणेशांना विडा अर्पण करावा.

दुर्वा मंत्र

गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।
एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।।
विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।
कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।।


हे मंत्र म्हणून २१ दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

यानंतर गणपतीची आरती करावी.